Thu, Jun 04, 2020 23:48होमपेज › Marathwada › धानोर्‍यात परप्रांतीय तरुणाकडून पत्नीची हत्या

रात्रभर रडून बाळ झोपले आईच्या मृतदेहावर

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 12:09AMधानोरा : प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील धानोरा येथे मोलमजुरी करण्यासाठी छत्तीसगढ येथून आलेल्या विनोद सतनामी या तरुणाने  पत्नीचा गळा दाबून खून केला.  त्याने आपल्या दोनवर्षीय चिमुकल्या बाळाला मृतदेहा जवळ सोडून पळ काढला.रात्रभर   रडून रडून बाळ आईच्या मृतदेहावरच झोपले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील कुसनी या गावचे रहिवाशी असलेले विनोद व बिमला सतनामी हे दांपत्य आपल्या लहान बाळासह धानोरा या गावात आले होते. भाडेतत्वावर खोली घेऊन ते बांधकामावर मजुरी करून उपजीविका भागवित होते. विनोद  मजूर म्हणून काम करत असे. शनिवारी रात्री  त्याने पत्नी विमलाचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. 

विनोद याचा मुलगा आईच्या मृतदेहाजवळ होता. रात्रभर रडून-रडून बाळ आईच्या मृतदेहावरच झोपी गेले. सकाळी बाळ उठल्यानंतर   पुन्हा रडू लागला. त्याचे रडने न थांबल्याने शेजारी राहणार्‍या एका महिलेने खिडकीतून डोकावून पाहिले. यानंतर सदरचा प्रकार तिच्या लक्षात आला. यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले तेव्हा मृत आईला बिलगलेल्या बाळाला पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सदर प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तपास जमादार व्ही. डी. थोरवे करीत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.