Thu, Jun 04, 2020 14:03होमपेज › Marathwada › खा. मुंडेंच्या विरोधात उमेदवाराची चाचपणी

खा. मुंडेंच्या विरोधात उमेदवाराची चाचपणी

Published On: Nov 16 2018 1:28AM | Last Updated: Nov 15 2018 10:04PMअंबाजोगाई:प्रतिनिधी

जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्याची खासदार म्हणून विविध विकास कामे, जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केल्याने त्यांच्याविषयी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याविरोधात उमेदवार कोण द्यावा, यासाठी इतर राजकीय पक्षांची जोरदार चाचपणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मध्यंतरी एका एक्झिट पोलच्या सर्वेच्या अहवालामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव  प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले. आता प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध उमेदवार कोण? याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.   बीड येथून  राष्ट्रवादी लढतो, त्यामुळे त्यांची जोरदार तयारी सुरू आहे.  यावेळी शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा फोकस विधानसभेवर असल्याने त्यांची चर्चा नाही. राष्ट्रवादीतर्फे बजरंग सोनवणे,अमरसिंह पंडित,जयदत्त क्षीरसागर,धनंजय मुंडे,आदी नावे चर्चेत आहेत. त्यातच बीड जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळ्यातील आरोपींच्या मागचा ससेमिरा शांत होत नाही, तोवर आणखी नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून कोणीच सुटलेले नाही. काँग्रेसकडूनही रजनीताई पाटील व पापा मोदी चर्चेत आहेत. विरोधी पक्ष बीडसह पुणे, मुंबई येथीही उमेदवारीवरून बैठकांचे फड घेत चाचपणी करीत आहेत.

मुंडे, क्षीरसागर चर्चेत

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर यांची नावे चर्चेत आहेत. अमरसिंह पंडित हेही ऐनवेळी मैदानात उतरू शकतात. राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू असली तरी ऐनवेळी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हे औत्सुक्याचे आहे.