Sun, Jun 07, 2020 07:13होमपेज › Marathwada › कुख्यात दरोडेखोर विलास बडे पकडला 

कुख्यात दरोडेखोर विलास बडे पकडला 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:02PMबीड ः प्रतिनिधी 

धारूर पोलिस ठाण्यातून नऊ महिन्यांपूर्वी पळून गेलेला कुख्यात दरोडेखोर विलास बडे याला कोल्हापूर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी गजाआड केले आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुरवलेल्या माहितीवरून कोल्हापूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. बुधवारी त्याला बीड पोलिस ताब्यात घेणार आहेत.

माजलगाव तालुक्यातील चाटगाव येथील विलास महादेव बडे याच्याविरुद्ध नेकनूर पोलिस ठाण्यात दरोडा, युसूफवडगावमध्ये कलम घरफोडी व दरोडा, धारुरमध्ये घरफ ोडी, बर्दापूर ठाण्यात दरोड्याची गुन्हे 2017 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर धारूर पोलिस ठाण्यामध्ये पुन्हा घरफ ोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. याच ठाण्यातून विलास बडे हा नोव्हेंबर 2017 मध्ये फरार झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक घनशाम पाळवदे आणि त्यांच्या टीमने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना त्याच्याविरुद्ध माहिती पुरवून हा फरार असल्याचे कळविले होते. याच माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी विलास बडे यास अटक केली. बीड पोलिसांची टीम कोल्हापूरला जाऊन ताब्यात घेणार असून बुधवारी धारूर पोलिासंच्या हवाली केले जाणार आहेत.