Thu, Oct 17, 2019 06:08होमपेज › Marathwada › भाजीपाल्याचे भाव कडाडले

भाजीपाल्याचे भाव कडाडले

Published On: Jul 09 2019 9:16AM | Last Updated: Jul 09 2019 9:12AM
बोरी : प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारांमध्ये बोरी परिसरातील जवळपास 35-40 खेड्यांची लोक बाजारासाठी येत असतात. मात्र भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे नागरिकांनी या बाजाराकडे पाठ फिरवली. भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. तर पावसाळा सुरू होऊनही पाऊस पडत नसल्याचा परिणाम भाजीपाल्यावर देखील झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत. 

बोरी बाजारपेठेमध्ये मिरची 60 रुपये किलो, भेंडी 60 रुपये किलो, गवार 60 रुपये किलो, आलू 15 रुपये, टमाटे 20 रुपये किलो, लसून 80 रुपये किलो, कोथिंबीर 300 रुपये, आद्रक 180 रुपये, शेपु 20 रुपये जुडी, लिंबू दोन रुपयाला एक नग, गोबी 60 रुपये किलो, शेवगा 60 रुपये, शिमला मिरची 60रुपये, दोडका 60 रूपये इत्यादी अशा पद्धतीने भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक गणित बिगडले आहे. भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांनी थोड्याफार प्रमाणात मध्ये पाठ फिरवली असे दिसून येत आहे. बोरीचा आठवडी बाजार गच्च भरलेला असायचा परंतु वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरामुळे ग्राहकांचा कल कमी आहे.

ग्राहकांनी भाज्यांना पर्याय असणाऱ्या डाळी व कडधान्य यांच्याकडे कल वाढला आहे. जून महिना संपला तरी पाऊस पडत नाही पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे  भाजीपाल्याच्या दरामध्ये  वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या शेवट पर्यंत भाज्यांचे दर असेच राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.