Thu, Jun 04, 2020 13:26होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँगेसला हादरा

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँगेसला हादरा

Published On: Apr 07 2018 12:48PM | Last Updated: Apr 07 2018 12:47PMपरंडा (जि. उस्मानाबाद) : प्रतिनिधी

अनाळा (ता. परंडा) गटाच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार धनंजय सावंत  यांनी राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच हादरा दिला आहे. त्यांनी १३०० मतांनी दणदणीत विजय मिळवित शिवसेनेचे संख्याबळ शाबूत राखले आहे.

शिवसेनेकडून आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांचे बंधू धनंजय यांनी उमेदवारी घेतल्यानंतर निवडणुकीत रंगत आली होती. राष्ट्रवादीचे दत्तात्रय पाटील यांच्यासाठी आमदार राहुल मोटे यांनी ताकद पणाला लावली होती. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही सभा झाली होती. तरीही महाआघाडीचा प्रयोग साकारत आमदार सावंत यांनी राष्ट्रवादीवर मात केली.

धनंजय सावंत यांना ६८०४ तर पाटील यांना ५५०४ मते मिळाली. याठिकाणी काँग्रेसला अवघ्या १०९ मतांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर सावंत यांची जल्‍लोषी मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. 

Tags : Byelection, ZP, Usmanabad, NCP, Shivsena