Sun, Jun 07, 2020 08:23होमपेज › Marathwada › काँग्रेसच्या उमेदवारावरून लातूरमध्ये दोन मतप्रवाह

काँग्रेसच्या उमेदवारावरून लातूरमध्ये दोन मतप्रवाह

Published On: Mar 26 2019 1:51AM | Last Updated: Mar 26 2019 1:52AM
लातूर : प्रतिनिधी

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या उमेदवारीवरून पक्ष नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले असून, उमेदवार बदलण्याची मागणी एका गटाने केल्याची शहरात चर्चा आहे.

लातूर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिरसाठ व नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांची नावे चर्चेत होती. या दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असेही निश्चित झाले होते. तथापि, ऐनवेळी पुण्यातील उद्योजक मच्छिंद्र कामत यांचे नाव पुढे आले व  पक्षाच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली; त्यानंतर काँग्रेसमधील एक गट कमालीचा नाराज झाल्याची चर्चा आहे. या नाराज गटाने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला आहे. तथापि, काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यास विरोध केल्याची चर्चा आहे. कामत यांची उमेदवारी नाकारल्यास अनुसूचित जातीवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखे होईल त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम ठेवावी अशी भूमिका या ज्येष्ठांनी घेतल्याची चर्चा आहे.