Sat, Jun 06, 2020 01:02होमपेज › Marathwada › ट्रक-कारच्या धडकेत दोन ठार

ट्रक-कारच्या धडकेत दोन ठार

Published On: Dec 20 2018 1:24AM | Last Updated: Dec 20 2018 1:24AM
ताडकळस : प्रतिनिधी

परभणी -वसमत महामार्गावर सागर चौपालजवळ ट्रक व  कारची मंगळवारी (दि. 18)  रात्री 11.30 ते 12 वाजे दरम्यान समोरासमोर धडक झाल्याने  दोघांचा मृत्यू झाला.

चालकाने ट्रक (एम.एच.44 - 9561) भरधाव व निष्काळजीपणे  चालवण्याने  निजामाबादहून येणार्‍या कारला (एम.एच.22- यू 5577) सागर चौपालजवळ जोराची धडक दिली. यात कारमधील  शेख फसिऊद्दीन (वय 60) व नरहरी कदम यांचा जागीच मृत्यू झाला.  म.उमेद म. गौसोदीन यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल झाला. कारचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनिल लांडगे,कर्मचारी गणेश  कदम हे करीत आहेत.