Thu, Jun 04, 2020 12:48होमपेज › Marathwada › विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Published On: Jul 22 2019 2:02AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
माजलगाव, प्रतिनिधी:   घरासमोरील विद्युत तारेमधून ओल्या बांबूमध्ये वीजप्रवाह उतरल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.21)  सकाळी मोगरा येथे घडली. मीराबाई शंकर जाधव (वय 32) व दत्ता रेखा राठोड (वय 23) अशी मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील मोगरा परिसरात शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे  विजेच्या तारेवर टाकलेले आकडे निघाले होते. त्यामुळे रविवारी सकाळी 9 च्या सुमारास ताडोबा तांड्यावरील मीराबाई शंकर जाधव यांनी नात्याने भाचा असलेल्या दत्ता रेखा राठोड यास तारेवर आकडा टाकण्यास सांगितले. तो बांबूच्या साहाय्याने आकडा टाकत होता. मात्र,  बांबू ओला असल्याने त्यामध्ये वीजप्रवाह उतरल्याने दत्ता थरथर कापू लागला. मीराबाई त्याला वाचवण्यासाठी धावल्या. त्यांनाही विजेचा धक्‍का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.  दत्ता राठोड हा अविवाहित आहे, तर मीराबाई यांना दोन मुले आहेत.