Sun, Jun 07, 2020 14:20होमपेज › Marathwada › चिंचगव्हाण येथे विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

चिंचगव्हाण येथे विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 1:56AMबीड : प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील विवाहित महिलेस घरगुती कारणावरून जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर घरातील मंडळी कडी लावून पसार झाली. घटनेची माहिती होताच काही ग्रामस्थांनी विवाहितेस रुग्णालयात दाखल केले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने एकच खळबळ  उडाली आहे. 

चिंचगव्हाण येथील राधिका गजानन गोरकर (वय 28) यांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून टाकण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी झाला. त्यांना पेटविल्यानंतर घरातील मंडळींनी धूम ठोकली. राधिका या आगीत जळत असल्याचे  लक्षात आल्यानंतर शेजारच्यांनी आग विझवली. त्यांना उपचारासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले. 95 टक्के भाजल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.