Thu, Jun 04, 2020 14:08होमपेज › Marathwada › टीबी हारेगा; देश जितेगा' भारतभर सायकलवरून नारा(video)

टीबी हारेगा; देश जितेगा' भारतभर सायकलवरून नारा(video)

Published On: Jul 23 2019 12:50PM | Last Updated: Jul 23 2019 3:44PM
उमरगा (जि. उस्मानाबाद) : प्रतिनिधी

ओडिशा राज्यातील रोटरी क्लबचा त्रिलोचन महालिक (२७ वर्ष) जागतिक क्षयरोग दिनानिमित्त २४ मार्च २०१९ रोजीपासून क्षयरोगाबाबत (टीबी) जनजागृती करण्यासाठी 'टीबी हारेगा; देश जितेगा' हा नारा घेवून भारतभर सायकलवरून प्रवास करत आहे. तर त्याने शहर, गाव, शाळा, महाविद्यालयात जावून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर लोंकाना क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले आहे. 

त्रिलोचन महालिक याने ओडीसा, बरामपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून महाराष्ट्र या सीमेवरून उस्मानाबाद जिल्हातील उमरगापर्यतचा दिड हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. यानंतर तो आज मंगळवार (दि. 23 रोजी) सकाळी उमरगा येथे पोहोचला. याठिकाणी त्रिलोचनचे स्वागत रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोपळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विनोद देवरकर यांनी करून शुभेच्छा दिल्या. 

यावेळी रोटरीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान त्रिलोचन यांनी दिल्लीत पोहचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.