Thu, Oct 17, 2019 13:04होमपेज › Marathwada › शाळा, महाविद्यालयांत आज ‘योगशिक्षणाचे धडे’

शाळा, महाविद्यालयांत आज ‘योगशिक्षणाचे धडे’

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:50PMपरळी : रवींद्र जोशी

योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परळीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच प्रशासकीय पातळीवरूनही याबाबत सूचना करण्यात आलेल्या असल्याने शाळा-महाविद्यालय परिसरात आज योगशिक्षणाचे धडे मिळणार हे निश्चित आहे. 

संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यास मान्यता दिली आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण होण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योग अभ्यासक देतात.  रोग निवारण्याच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. सरकारी पातळीवरून ही याबाबत मोठी जनजागृती करण्यात येते. त्यामुळे योगदिनाचा सर्वत्र माहोल झाल्याचे पाहावयास मिळते. प्रशासकीय पातळीवर आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजनासाठी सूचना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने ही प्रत्येक शाळा -महाविद्यालयात योगदिन साजरा करावा तसेच योग प्रात्यक्षिके, सराव शिबिरे आयोजनासाठी मार्गदर्शन सूचना केल्या आहेत.