Thu, Jun 04, 2020 22:32होमपेज › Marathwada › हजारो भाविक चिंतामणीच्या चरणी लीन; नवसाच्या मोदकाचे वाटप सुरू (Video)

हजारो भाविक चिंतामणीच्या चरणी लीन; नवसाच्या मोदकाचे वाटप सुरू (Video)

Published On: Sep 23 2018 12:13PM | Last Updated: Sep 23 2018 12:15PMहिंगोली : प्रतिनिधी

नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेनंतर नवसाच्या मोदकाचे वाटप सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत जवळपास दीड लाख भाविकांनी विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली आहे.

शहरातील गड्डेपीर भागात असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून शनिवारी रात्रीपासूनच भाविक दाखल होत होते. रात्री 12.05 मिनीटाने विघ्नहर्त्याच्या दर्शनास सुरूवात झाली. शहरातील बाबासाहेब आबेडकर पुतळ्यापासून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी विधीवत पुजा करून नवसाच्या मोदकाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. हजारो भाविक शहरात दाखल झाल्यामुळे त्यांच्या भोजनाची व्यवस्था सामाजिक संघटनांकडून करण्यात आली होती. भोजनाबरोबरच निवासाची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला. पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहनांसाठी स्वतंत्र पार्कींगची व्यवस्था रामलिला मैदानावर करण्यात आली आहे. शहरातील ऑटो संघटना व टेम्पो संघटनेच्यावतीने भाविकांना मोफत सेवा दिली जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत भक्‍तांचा ओघ सुरूच राहणार असल्याची माहिती चिंतामणी संस्थानच्यावतीने देण्यात आली आहे. 

हिंगोली शहरात संपूर्ण रस्ते गर्दीने फुलून गेले होते. अत्यंत शिस्तीने भाविक विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेवून मोदकाचे वाटप करीत आहेत. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्‍तांना जाग्यावरच फराळाची व्यवस्था केली जात आहे. यासाठी जवळपास हजार पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करीत आहेत.