Thu, Oct 17, 2019 06:24होमपेज › Marathwada › परभणी : अज्ञात व्यक्तीने टाकले विहिरीत विषारी औषध 

परभणी : अज्ञात व्यक्तीने टाकले विहिरीत विषारी औषध 

Published On: Jun 17 2019 8:52PM | Last Updated: Jun 17 2019 7:44PM
सोनपेठ : प्रतिनिधी

तालुक्यातील आवलगाव शिवारातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याची घटना घडली. काल, रविवार, (दि.१६) रोजी राञी ८ ते आज, सोमवार, (दि.१७) सकाळी ७ च्या दरम्यान हे औषध टाकल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकार पिंप्री येथील संदिप डोंगरे यांच्या वडीलाच्या नावावर आवलगाव शिवारात शेती असून तेथे विहीर आहे. आज, सोमवार  सकाळी सात वाजता संदिप डोंगरे व त्यांचे वडील शेतात गेले असता त्यांना विहिरीतील पाण्याचा रंग पिवळा दिसला. यावेळी त्यांनी विहिरीत वाकुण पाहिले असता पाण्याचा औषधासारखा वास आला. डोंगरे यांनी या पाण्याची पाहणी केली असता विषारी औषधासारखा वास येत होता. यावरून डोंगरे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.