Thu, Oct 17, 2019 06:10होमपेज › Marathwada › 'शिवस्मारक होऊ नये हीच सरकारची इच्छा'

'शिवस्मारक होऊ नये हीच सरकारची इच्छा'

Published On: Jan 17 2019 1:31AM | Last Updated: Jan 17 2019 1:31AM
नांदेड : प्रतिनिधी

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे तीन वेळा भूमिपूजन होऊनही काम सुरू झाले नाही. आता या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने हे स्मारक होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

भाजप व शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राज्यात सत्ता मिळविली. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे स्मारक उभारण्याची पोकळ घोषणा या सरकारने केली. परंतु, मागील साडेचार वर्षांत तीन वेळा भूमिपूजन करूनही स्मारकाच्या कामाला सरकारने सुरुवात केली नाही. आता या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता या स्मारकाचे काय होणार, असा सवाल त्यांनी केला.