Sat, Oct 19, 2019 09:42होमपेज › Marathwada › बीड : अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

बीड : अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Published On: Apr 16 2019 5:24PM | Last Updated: Apr 16 2019 5:24PM
माजलगाव : प्रतिनिधी 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड देवदहिफळ रस्त्यालगत शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. श्रीहरी उर्फ बंडु भानुदास वड्डे (वय ४१) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवार (दि.१५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात आज, मंगळवारी सकाळी त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर देवदहिफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

श्रीहरी वड्डे व त्यांच्या पत्नी हे आपल्या घरा शेजारील शेतात मळी पसरवण्याचे काम करत होते. याचवेळी वातावरणातील बदलामुळे वादळी पावसाची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या पत्नीला घरी पाठवुन दिले. तर वड्डे  शेतात आवराआवर करताना वीजाचा कडकडात होत असतानाच अचानक शेतात वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मयत श्रीहरी वड्डे यांच्या पश्चात पत्नी, तिन मुली व एक मुलगा असुन आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या वड्डे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत वड्डे कुटुंबास मदत करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.