Sat, Jun 06, 2020 17:14होमपेज › Marathwada › हर हर महादेवाच्या जयघोषाने औंढा नगरी दुमदूमली

हर हर महादेवाच्या जयघोषाने औंढा नगरी दुमदूमली

Published On: Mar 04 2019 2:23PM | Last Updated: Mar 04 2019 2:23PM
औंढा नागनाथ : प्रतिनिधी 

महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या आठव्या नागेश दारूकावने औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि.4) पहाटे पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेवाच्या जयघोषाने औंढा नगरी दुमदूमली होती. 

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील अविनाश आकमार यास प्रथम दर्शनाचा लाभ मिळाला. संस्थानच्यावतीने अविनाश आकमार यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी रात्री २ च्या सुमारास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तत्पूर्वी खासदार राजीव सातव यांनी सपत्नीक नागनाथाची पुजा केली. महाशिवरात्रीनिमित्त नागेश्‍वराच्या पिंडीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्यासह विश्‍वस्त उपस्थित होते. पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.