Sun, May 31, 2020 01:51होमपेज › Marathwada › बीडला  विधानमंडळ अंदाज समिती येणार 

बीडला  विधानमंडळ अंदाज समिती येणार 

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:46AMबीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील विविध कामकाजांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाची अंदाजसमिती 30 व 31 ऑगस्टला जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सदरील अंदाज समितीमध्ये 27 आमदारांचा समावेश असून आमदार अनिल कदम हे या समितीचे प्रमुख असणार आहेत. या अनुषांगाने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजांची सर्व माहिती एकत्रित करण्याचे काम  सुरू आहे. 

विधानमंडळ अंदाज समितीमध्ये 27 आमदार असणार असून यामध्ये 24 विधानसभा सदस्य तर 4 विधान परिषद सदस्यांचा समावेश आहे. आमदार अनिल कदम हे समितीचे प्रमुख असणार आहेत. समितीमध्ये आमदार धनंजय गाळगीळ, उन्मेष पाटील, कृष्णा खोपडे, देवयानी फरांदे, विजय रहांगडाले, प्रकाश आबीटकर, डॉ.संजय रायमुलकर, प्रताप पाटील-चिखलीकर, विजय वडेट्टीवार, कुणाल पाटील, वसंतराव चव्हाण, राजेश काशीवार, दादासाहेब मुरकुटे, आकाश फुंडकर, कृष्णा गजबे, रमेश बुंदेले, सुनील प्रभू, शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रदीप जाधव, धैर्यशील पाटील, अबू आझमी, डॉ.नीलम गोर्‍हे, राहुल नार्वेकर, सुजितसिंह ठाकूर, अनिल गाडगीळ यांचा समावेश आहे.

29 ऑगस्टला विधान मंडळाची अंदाजसमिती बीड येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असणार आहे. 30 ऑगस्टला सकाळी 9 ते दुपारी 2 यानंतर पुन्हा दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत ही समिती विविध विभागांना भेटी देणार आहे. 31 ऑगस्टला सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत पुन्हा सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेऊन प्रसंगी कामांना भेट देऊन पाहणी केली जाणार असून दुपारी 3 ते 5 या वेळेत बैठक घेणार आहेत.