Thu, Oct 17, 2019 13:19होमपेज › Marathwada › सेवा ज्येष्ठतेसाठी शिक्षकांचे आक्षेप

सेवा ज्येष्ठतेसाठी शिक्षकांचे आक्षेप

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 10 2018 12:58AMबीड : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक पदवीधर यांची सेवा ज्येष्ठता यादी करण्यात येत आहे. या यादी संदर्भात ज्या शिक्षकांना आक्षेप आहे, ते नोंदविण्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले होते. गुरुवार सायंकाळपर्यंत शंभरपेक्षा अधिक शिक्षकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येत आहे. यातील काही संदर्भात माहिती अपूर्ण होती, त्यामुळे ही माहिती भरून ती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे गुरुवारपर्यंत देण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले होते. या माहितीमध्ये वेतनश्रेणी, पदवीची विषय, शैक्षणिक अर्हता, शाळेमध्ये बदल झाला असल्यास ती दुरुस्त करणे आदी बाबींची माहिती देण्यास सांगण्यात आले होते.

यावरून जिल्ह्यातील शंभर शिक्षकांनी आपले आक्षेप गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे नोंदविले आहेत. या आक्षेपावर गटशिक्षण अधिकारी आपले अभिप्राय नोंदविणार आहेत, त्यानंतर या यादीची जिल्हा परिषदेत पडताळणी होणार आहे. यानंतर सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी दिली.