Sun, Jun 07, 2020 15:46होमपेज › Marathwada › तलाठ्यास ठार मारण्याची धमकी

तलाठ्यास ठार मारण्याची धमकी

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:15PMआष्टी : प्रतिनिधी

तालुक्यातील कानडी बुद्रुक हद्दीमध्ये वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी यांना मिळाली. ट्रॅक्टरचालकावर गुरुवारी रात्री कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याची चालकाने धमकी दिली. या प्रकरणी चालकावर आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक शिवारातून अवैध खनिज उपसा केला जात आहे.

गुरुवारी रात्रीही ट्रॅक्टरद्वारे वाळू चोरी होत असल्याची माहिती नांदा सज्जाचे तलाठी अरुण किसन जवंजाळ, आर. बी. जाधव, कोतवाल अशोक भुकन यांनी मिळाली.   तलाठी जवंजाळ, जाधव व भुकन या ठिकाणी गेले असता त्यांना तीन ट्रॅक्टर उभे असल्याचे व काहीजण वाळू उपसा करताना दिसले. तलाठी जवंजाळ यांनी ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टी व परवानगीची विचारपूस केली. यानंतर तीनही ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह तेथून पळ काढला.

यातील निलेश यादव यास अडवून ट्रॅक्टर व ट्रॉली कडा ठाण्यात घेऊन जाण्याचे  अरुण जवंजाळ यांनी सांगितले, मात्र निलेश यादव याने तलाठी अरुण जवंजाळ यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. नंतर तेथून पळ काढला. या प्रकरणी तलाठी जवंजाळ यांच्या फिर्यादेवरून नीलेस यादवसह अन्य दोघांवर आष्ठी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.