Sat, Jun 06, 2020 23:40होमपेज › Marathwada › मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या : पंकजा मुंडे

मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्या : पंकजा मुंडे

Published On: May 15 2019 7:52PM | Last Updated: May 15 2019 7:44PM
बीड : प्रतिनिधी

भीषण दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता यावर उपाय योजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी मंत्रिमंडळ उप समितीच्या बैठकीत केली. ही बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

मंत्रिमंडळ उप समितीची बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी यावेळी उपस्थित होते. 

शेळी-मेंढींना चारा पाणी द्या 

दुष्काळी परिस्थितीत शेळी व मेंढ्यांना देखील चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, तशी तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्याबरोबरच पंकजाताई मुंडे यांनी नागरिक व ग्रामस्थांना सध्या जेवढ्या प्रमाणात टॅकरने पाणी पुरवठा केला जातो, त्यात आणखी वाढ करून जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणीही बैठकीत केली.