Sun, May 31, 2020 03:32होमपेज › Marathwada › अभियंत्याकडे घबाड

अभियंत्याकडे घबाड

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 21 2018 12:15AMबीड : प्रतिनिधी 

महावितरणमधील निवृत्त अधीक्षक अभियंता हरिभाऊ कुंडलिक घुले यांच्याकडे 18 लाखांहून अधिक रुपयांची बेहिशोबी संपत्ती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी  हरिभाऊ घुले यांच्यासह कुटुंबातील चौघांवर केज ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपसंपदा (बेहिशोबी) मालमत्तेचे हे पहिलेच प्रकरण ठरले आहे.  

 हरिभाऊ घुले हे औरंगाबाद येथून महावितरणमधील अधीक्षक अभियंता या वर्ग 1 पदावरून 2002 साली सेवानिवृत्त झाले होते़  ते केज तालुक्यातीले टाकळी येथील रहिवासी आहेत़  घुले यांनी त्यांच्या कार्यकाळा मूळ वेतनापेक्षा अधिक पैसा कमाविला असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार एका व्यक्तीने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने त्यांची चौकशी केली होती. टाकळी येथे त्यांची 30 एकर जमीन असून तेथील घरी कोणी राहत नाही़  घुले यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा तब्बल 23 टक्के संपत्ती बेहिशोबी आढळून आली़   

सुमारे 18 लाख 37 हजार 973 रुपयांच्या संपत्तीचा हिशेब घुले यांना देता आला नाही़ बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचीही मदत लाभल्याचे चौकशीत उघड झाले़  त्यानुसार हरिभाऊ घुले, पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा डॉ़  अजित व अमर घुले यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै 2018 मध्ये झालेल्या कायदा दुरुस्तीनुसार ही कलमे लावण्यात आली आहेत़  उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यास्ह निरीक्षक गजानन वाघ, औरंगाबाद एसीबीच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी ही कारवाई केली़