Fri, Jun 05, 2020 22:04होमपेज › Marathwada › घटस्थापनेने श्री योगेश्‍वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

घटस्थापनेने श्री योगेश्‍वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

Published On: Oct 11 2018 1:19AM | Last Updated: Oct 11 2018 1:19AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्‍वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास बुधवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्‍वरी देवीची विधीवत महापूजा केली. महापूजेनंतर योगेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत श्री योगेश्‍वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. बुधवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार संतोष रूईकर व कमल संतोष रूईकर यांनी श्री योगेश्‍वरी देवीची विधीवत महापूजा केली. या महापुजेसाठी सचिव भगवानराव शिंदे, देवीचे पृथ्वीराज पुजारी, कृष्णा पुजारी, विश्‍वस्त, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

विविध उपक्रमांची रेलचेल

श्री योगेश्‍वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम सुरू झाले आहेत. आज दुपारी अंबाजोगाई येथे सहयोग महिला भजनी मंडळ, सोमेश्वर महिला भजनी मंडळ, संकटमोचन महिला भजनी मंडळ, वीरशैव महिला भजनी मंडळ, सत्संग महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, दत्त मंदिर महिला भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.

तर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीकिसन महाराज पवार यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांना वादनासाठी श्रीनिवास जगताप, प्रवीण सलगर, व्यंकट धायगुडे, दामु भालेकर, माणिक तळणीकर, दीपक अदाटे, मुकुंद पवार यांनी साथसंगत केली. या सर्व उपस्थितांचे व कलावंतांचे स्वागत योगेश्‍वरी देवल कमिटीचे विश्‍वस्त उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, पूजा कुलकर्णी, गौरी जोशी यांनी केले.