Thu, Jun 04, 2020 12:37होमपेज › Marathwada › हिंगोली : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

हिंगोली : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Published On: Sep 15 2019 10:15PM | Last Updated: Sep 15 2019 10:36PM
हिंगोली : प्रतिनिधी

दूध आणून दे असे निमित्त करून घरात बोलवून एका नराधमाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील जामठी बु. येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात आज रविवारीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी सेनगाव तालुक्यातील जामठी बु. येथे राहणाऱ्या नराधम नामदेव त्र्यंबक जाधव याने गावातीलच एका सहा वर्षीय चिमुकलीला दूध आणण्यासाठी चे निमित्त करून स्वतःच्या घरात बोलावले. ती घरात येताच या नराधमाने निष्पाप चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना चिमुकलीने घरी आईला सांगितली. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात नामदेव जाधव याच्या विरुद्ध कलम 376 (ए) (बी) 354 भा द वी व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 कलम 3, 4,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, संबंधित प्रकरणातील आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.