Thu, Oct 17, 2019 13:06होमपेज › Marathwada › नांदेड : शिवशाही बसला अपघात; चार जखमी

नांदेड : शिवशाही बसला अपघात; चार जखमी

Published On: Jul 10 2019 1:24PM | Last Updated: Jul 10 2019 1:31PM
नांदेड : प्रतिनिधी  

नागपूरहून नांदेडकडे जाणार्‍या शिवशाही बसला अपघात झाला. यात चालक व वाहकासह दोन प्रवाशी जखमी झाले. नांदेडपासून जवळ पिंपळगाव येथे आज, बुधवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. 

कैलास शेळके(चालक), नामदेव यशवंतराव कावळे(वाहक), शाम कृष्णाराव डोरे (रा. यवतमाळ), राम कृष्णराव डोरे अशी जखमींची नावे आहेत. 

शिवशाही बस क्रमांक (एमएच-०६-बीडब्ल्यू-०८१३) ही नागपूरहून नांदेडकडे निघाली होती. याचवेळी चालक शेळके याला डुलकी लागली. त्यामुळे शेळके याचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बसने रस्त्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शक फलकाच्या खांबाला धडक दिली. या अपघातात बसचालक, वाहक तसेच दोन प्रवाशी जखमी झाले. जखमींवर विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.