Thu, Jun 04, 2020 23:43होमपेज › Marathwada › बीडमध्ये पुन्हा ३० लाखाची रोकड पकडली

बीडमध्ये पुन्हा ३० लाखाची रोकड पकडली

Published On: Apr 09 2019 2:51PM | Last Updated: Apr 09 2019 2:50PM
बीड : प्रतिनिधी

बीड बसस्थानकासमोर सोमवारी सायंकाळी 50 लाख रुपायाची रोकड पकडण्यात आली होती. यानंतर आज मंगळवारी पुन्हा बीड बसस्थानकासमोर एका कारमधून 30 लाख रुपायाची  रक्कम पकडण्यात आली. यामुळे बीडमध्ये चर्चेला उत आला आहे.

 बीड जिल्हा वाहतूक शाखेने आज  बसस्थानकासमोर अल्टो (mh-20 bc- 3319) या कारमध्ये 30 लाख रुपयांची रोकड पकडली. सदरील रोकड बँकेची असून, निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.