Thu, Jun 04, 2020 13:43होमपेज › Marathwada › वंचितच्या कार्यकर्त्यांकडून 'पीआय'ला कार्यालयात घुसून मारहाण (video)

वंचितच्या कार्यकर्त्यांकडून 'पीआय'ला कार्यालयात घुसून मारहाण (video)

Published On: Sep 08 2019 7:20PM | Last Updated: Sep 08 2019 7:31PM
नांदेड : प्रतिनिधी 

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोटार वाहन निरीक्षकालाच मारहाण केली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरला म्हणून नांदेड येथील आरटीओ कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. वंचितच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, मोटार वाहन निरीक्षक डोंगरे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरला. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन डोंगरे यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी 'माझ्या वक्‍तव्याने तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करतो असे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू, कार्यकर्त्यांनी त्यांनाच कार्यालयात मारहाण करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान, या मारहाणीबद्दल अजून कोणीही तक्रार केलेली नाही. मारहाणीवेळी वंचित बहुजन आघाडीचे ३० ते ४० कार्यकर्ते उपस्थित होते.