होमपेज › Marathwada › बीड :  प्रीतम मुंडे यांची आघाडी कायम

बीड :  प्रीतम मुंडे यांची आघाडी कायम

Published On: May 23 2019 11:19AM | Last Updated: May 23 2019 8:24PM

बीड : प्रतिनिधी 
बीड लोकसभा मतदार संघातून  भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी सहाव्या फेरी अखेर 34 हजार 243 मतांची आघाडी घेतली आहे. बजरंग सोनवणे हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघाच्या आघाडीत एकट्या आष्टी मतदारसंघाने प्रीतमताई मुंडे यांना बंपर आघाडी दिल्याचे पहायला मिळत आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार प्रीतम मुंडे यांना आतापर्यंत 84 हजार 685 तर बजरंग सोनवणे यांना 59 हजार 654 तर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना 8 हजार 780 तर बंजारा समाजाचे संपत रामसिंग चव्हाण यांना 2 हजार 338 मते मिळाली आहेत. एकूण 1 लाख 62 हजार 638 मतांची मोजणी जाहीर झालेली आहे.