Sun, Jun 07, 2020 13:31होमपेज › Marathwada › काँग्रेसकडून देशद्रोह्यांना मोकळीक देण्याचा डाव : माेदी (Video)

काँग्रेसकडून देशद्रोह्यांना मोकळीक देण्याचा डाव : माेदी (Video)

Published On: Apr 09 2019 11:23AM | Last Updated: Apr 09 2019 12:18PM
लातुर : पुढारी ऑनलाईन

लातूरमधील औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची विराट जाहीर सभा सुरू झाली आहे. युतीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गरिबी हटाव हा नारा राहुल तुमच्या आजीपासून सुरू झाला आहे. राहुल तुमची गरिबी हटली पण जनतेची कधी. नरेंद्र भाई खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहा. माझ्या शेवटच्या शेतकऱ्याला प्रत्येक योजनेचा लाभ मिळायलाच पाहिजे. उद्या दाऊद जर आला तर त्याला मांडीवर घेवून दूध पाजणार आहात काय, असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. 

नरेंद्र मोदी काय म्हणाले...
- या पुण्यभूमीला माझा साष्टांग नमस्कार, असे मराठीतून भाषणाला मोदी यांनी सुरूवात केली.

- नरेंद्र मोदी यांनी श्रीमान उद्धव ठाकरे यांना छोटे भाई असे संबोधले.
- तुमचे कष्ट मी कधीच वाया घालवणार नाही. व्याजासोबत त्याची परतफेड करणार.
- २०१४ मध्ये अनेक लक्ष समोर ठेऊन तुमच्या समोर आला होतो.
-  या पाच वर्षात चौकीदाराची कमाई केवळ विश्वास आहे.
- दहशतवाद्यांच्या घरात घुसून हल्ला करने हे नव्या भारताची निती आहे. 
- दहशतवाद्यांच्या घरात घुसून हल्ला करण्याचा वादा केला होता आणि त्याला सुरूवात केली आहे.
- नक्षलवाद आणि माओवादातून देशमुक्त करण्याचा आमचा संकल्प केला आहे. 
- काँग्रसेच्या घोषणा पत्रात जी भाषा वापरली आहे तीच भाषा पाक वापरत आहे.  
- जे काँग्रेसला हवे तेच पाकिस्तानला हवे आहेत. 
-काँग्रेसकडून देशद्रोह्यांना मोकळीक देण्याचा डाव.
- काँग्रेसनेच बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्व हिरावून घेतले.
- ओमर अब्दुलांच्या वक्तव्याचा धागा पकडून मोदींचे टीकास्त्र
- देशहितासाठी भाजप सरकारच काम करत आहे.
- देशाच्या विकासाठी पेन्शन योजना सुरू केली आहे.