Thu, Jun 04, 2020 22:00होमपेज › Marathwada › परभणी : लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

परभणी : लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

Published On: Apr 17 2019 4:25PM | Last Updated: Apr 17 2019 4:25PM
पाथरी : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्यात काही मतदार संघात उद्या (ता.१८) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात उद्या (दि.१८) गुरुवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी व्ही. एल. कोळी यांनी दिली. 

पाथरी शहरातील आय टी आय इमारती मधील स्ट्राँग रुममधुन पाथरी विधानसभा मतदारसंघातील ३९५ मतदान केंद्रासाठी  मतदान पेट्या वितरणाचे काम आज, (दि १७) बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत पुर्ण झाले. मतदान प्रक्रियेसाठी १८०० कर्मचारी व पोलिस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पाथरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४९ हजार ९३१ मतदार आहेत. पुरुष मतदार १ लाख ८२ हजार २२४, स्त्री मतदार १ लाख ६७ हजार ७०४ तर ३ तृतीयपंथी अशी मतदार संख्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस कर्मचारी अंगणवाडी ताई, शिपाई, रोजगार सेवक तसेच प्रत्येक गावात स्वयंसेवक म्हणून एक विद्यार्थी असणार आहे.

मतदान केंद्रासाठी मतदान पेट्याचे साहित्य वाटपासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी व्हि एल कोळी, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, मानवतचे तहसीलदार फुफाटे, सोनपेठचे तहसीलदार बिराजदार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला होता.