Fri, Jan 24, 2020 20:09होमपेज › Marathwada › ‘अनुकंपाधारकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य’  

‘अनुकंपाधारकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य’  

Published On: Dec 27 2018 1:07AM | Last Updated: Dec 27 2018 1:07AM
परभणी : प्रतिनिधी 

राज्यातीलअनुकंपाधारकांचे प्रश्‍न दुर्लक्षित आहे. ते सोडविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे शिवसेना आ. डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यातील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांचे सेवा बजावत असताना निधन झाल्यास त्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावरील नोकरी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. असे असताना प्रशासनातील काही अधिकारी जाणीवपुर्वक नियुक्ती आदेश देण्यासाठी दिरंगाई करतात. वयाच्या अटी समोर करीत अनुकंपाधारकास नियुक्ती आदेश देण्यास अपात्र ठरवितात. येत्या अधिवेशनात प्रश्‍न मांडून अनुकंपधारकांना न्याय मिळून देणार असल्याचे  आ. राहूल पाटील यांनी सांगितले.

शासनाने अनुंकपातत्वावरील नोकरीसंर्दभात वयाची अट शिथील करावी आणि 1 जानेवारी 2017 पासून नियुक्‍त आदेशास अपात्र ठरविलेल्या अनुकंपधारकांना नियुक्‍ती आदेश द्यावेत.  1 जानेवारी 2017 पासून अनुकंपधारकांच्या ज्येष्ठता यादीतील नावे हेतुपुरस्पर वगळण्यात आली आहे. 

रिक्त होणार्‍या पदानुसार अनुंकपाधारकांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत असा शासनाचा निर्णय  आहे. 45 वर्षे ही वयाची अट रद्द करण्यात येवून ती वाढविण्यात यावी, अशा आशयाची मागणी अनुंकपाधारक संघटनांच्या वतीने आ.डॉ.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

फेब्रुवारी 2019 मध्ये होवू घातलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात अनुकंपाधारकांना विनाअट शासन सेवेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी तारांकीत प्रश्‍न मांडून त्यांना न्याय मिळून देणार असल्याचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी सांगितले.  मंगळवारी  परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा अनुकंपाधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आ. पाटील यांची भेट घेवून निवेदन सादर केले.