Thu, Jun 04, 2020 23:28होमपेज › Marathwada › सर्व कारखानदारांना प्रतिवादी करा : औरंगाबाद खंडपीठाची सूचना

सर्व कारखानदारांना प्रतिवादी करा : औरंगाबाद खंडपीठाची सूचना

Published On: Feb 09 2019 1:42AM | Last Updated: Feb 08 2019 11:38PM
नांदेड : प्रतिनिधी

सन 2014-15 च्या गळीत हंगामात ऊस उत्पादकांना मोठ्या विलंबाने एफआरपी देणार्‍या साखर कारखानदारांनी त्यावरील व्याजही दिले पाहिजे, अशी मागणी करणार्‍या याचिकेत राज्यातील सर्वच साखर कारखानदारांना प्रतिवादी करा, असे औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्यास सुचविले आहे. ही याचिका सध्या 28 कारखान्यांपुरती मर्यादित आहे. 

वरील हंगामात नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यासह विभागातील 28 कारखान्यांनी ‘एफआरपी’चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावला होता.त्यांची याचिका निकाली काढताना, खंडपीठाने त्यावेळी राज्याच्या साखर आयुक्‍तांना आवश्यक ते आदेश दिले होते.