Mon, Jun 01, 2020 20:03
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › परभणी : सोनपेठामध्ये किराणा दुकानात चोरी

परभणी : सोनपेठामध्ये किराणा दुकानात चोरी

Published On: Apr 06 2019 1:46AM | Last Updated: Apr 05 2019 6:56PM
सोनपेठ : प्रतिनिधी

सोनपेठ शहरात चोरट्यांनी एक होलसेल किराणा विक्रीचे दुकान फोडून तब्बल १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद सोनपेठ पोलिसात झाली आहे.  

सोनपेठ शहरातील आठवडी बाजारात किराणा सामान मालाचे नवनाथ वांकर यांचे होलसेल दुकान आहे. सदर दुकान नवनाथ वांकर यांनी (दि.४) रोजी नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यानंतर रात्री ते बंद करुन घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकून आत प्रवेश केला. यामध्ये दुकानातील अनेक किराना मालाच्या वस्तुसह नगदी ऐवज मिळून १ लाख ६५ हजारांची चोरी केली.

या दरम्यान अज्ञात चोरट्याविरुद्ध सोनपेठ पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चोरीची माहिती पोलिसांना मिळाल्याने शहरात श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. 

मात्र चोरटयांचा  तपास करण्यास श्वान पथकास अपयश आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी लांजे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची गती वाढवली आहे. पुढील तपास सपोनि शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलिस  करत आहेत.