Sat, Jun 06, 2020 16:35होमपेज › Marathwada › परभणी : शेवडीत पोलिस गाडीवर दगडफेक

परभणी : शेवडीत पोलिस गाडीवर दगडफेक

Published On: Apr 18 2019 5:23PM | Last Updated: Apr 18 2019 5:07PM
बोरी (परभणी): प्रतिनिधी 

मानवत तालुक्यातील शेवडी (जहांगीर) येथे पोलिस गाडीवर दगडफेक केल्याची घटना आज (ता.१८) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेते फौजदार बाळासाहेब डोंगरे व मतदानासाठी वापरण्यात आलेले खाजगी वाहनाचा चालक  गायकवाड हे जखमी झाले आहेत. 

मतदान केंद्राच्या १०० मीटर आत असलेले गावातील  दुकान बंद करण्याच्या सूचना संबंधित दुकानदारास बुधवारी (ता.१७ ) रात्री पोलिसांनी दिली होती. परंतु,  दुकानदाराने  सूचनेस न जुमानता दुकान चालूच ठेवले. त्यावर फौजदार डोंगरे व कर्मचार्‍यांनी दुकानस्थळी जाऊन दुकान बंद केले. दरम्यान गाडीकडे परत येत असताना  गावकर्‍यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यात  डोंगरे यांच्यासह खाजगी वाहनचालक गायकवाड जखमी झाले.  तसेच मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्‍या पोलिस वाहनाची तोडफोड झाली.

 दरम्यान, या घटनेनंतर शेवडी येथील केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.  घटनेची माहिती मिळताच तहसिलदारांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांनी कर्मचारी वाढवून परस्थितील नियंत्रणात आणली. जखमी पोलिस कर्मचार्‍यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दगडफेक करणार्‍यांवर शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.