Sun, Nov 17, 2019 07:41



होमपेज › Marathwada › परभणी : रस्त्याचे चौपदरीकरणासाठी एक लाख सह्यांचे निवेदन

परभणी : रस्त्याचे चौपदरीकरणासाठी एक लाख सह्यांचे निवेदन

Published On: May 22 2019 3:03PM | Last Updated: May 22 2019 3:00PM




जिंतूर : प्रतिनिधी

गत दोन दिवसांपासून जिंतूर शहरासह आदी ठिकाणी जनजागृती मोहीम राबवून जिंतूर ते परभणी या रखडलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी एक लाख सह्यांचे निवेदन घेण्‍याची मोहिम राबवण्‍यात आली. या एक लाख सह्या संग्रहित करून हे निवेदन बुधवारी (दि.२२) विभागीय आयुक्त व राज्यरस्ते विकास मंडळ विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी रवाना झाले. 

या शिष्टमंडळात ब्रिजगोपाल तोष्णीवाल,  ॲड. मनोज सारडा, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अॅड. गोपाळ रोकडे, अॅड. विनोद राठोड, संतोष देशमुख, बगाळे गजानन, चौधरी गणेश, कुऱ्हे साळवे  तसेच विजय चोरडिया व शेख शकील आदींचा समावेश आहे.