Thu, Jun 04, 2020 22:21होमपेज › Marathwada › परळी शहरालगतचा जुना पुल खचला

परळी शहरालगतचा जुना पुल खचला

Published On: Jun 17 2019 6:39PM | Last Updated: Jun 17 2019 4:49PM
 परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

शहरातील काळरात्री मंदिराच्या पलिकडे घनशी नदीवरील रस्त्यावर असलेला पुल खचला असून कोणत्याही क्षणी कोसळला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून संबंधितांनी याकडे लक्ष देऊन दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

शहरालगत असलेल्या घनशी नदीवरील पुल संपुर्णतः खचला असून वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या खचलेल्या पुलावरुनच सध्या वाहनांची ये -जा सुरू आहे. हा पुल कोणत्याही क्षणी कोसळला जाण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. या ठिकाणी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज आहे. अथवा या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्याची गरज आहे. अन्यथा मोठया दुर्घटनेला सामोरे जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.