Sun, Oct 20, 2019 17:25होमपेज › Marathwada › पंकजा मुंडेंनी केले सावरगावचे भगवानभक्ती गड असे नामकरण

पंकजा मुंडेंनी केले सावरगावचे भगवानभक्ती गड असे नामकरण

Published On: Oct 18 2018 9:10PM | Last Updated: Oct 18 2018 9:10PMबीड : प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव येथे आज दसरा मेळावा पार पाडला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे यांनी यावेळी उपस्थीत जनसमूदायास संबोधीत केले. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे या ही उपस्थित होत्या.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, संत नेहमी भक्ती, भाव शिकवत असतात. संत तुकाराम महाराज, भगवान बाबा, नामदेव महाराज, जनाबाई, चोखा मेळा या संतांनी भक्तांना भक्ती शिकवली. ईश्वराच्या भक्तीत ते लीन झाले. मात्र कोणत्याही संताने भक्तीचा बाजार मांडला नाही, असा अप्रत्यक्ष टोला मारत आज भगवान बाबा नगर जिल्ह्याची सीमा ओलांडून बीड जिल्ह्यात आले आहेत. जिथे भक्त तिथेच भगवान बाबा आहेत असे सांगून आजपासून बाबांची जन्मभूमीला भगवानभक्ती गड म्हणून ओळखले जाईल. इथे येणारा प्रत्येक भक्त चांगले विचार घेऊन जाईल. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक दसरा मेळाव्याला सावरगावात येऊन भक्तीचा धागा बांधले असे त्या म्हणाल्या.

यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच यावेळी भगवानबाबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पंकजा मुंडे यांच्याहस्ते झाले.