Sun, May 31, 2020 02:31होमपेज › Marathwada › पंकजा मुंडे यांचे चुलतबंधू रामेश्वर मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंकजा मुंडे यांचे चुलतबंधू रामेश्वर मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: Apr 17 2019 8:14AM | Last Updated: Apr 17 2019 8:14AM
परळी : प्रतिनिधी 

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांनी मंगळवारी आपले बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली असताना त्यांनी बहिणीची साथ सोडत भावावर विश्वास दाखवला. 

बीड लोकसभा निवडणुकीला बहीण- भावाच्या लढतीचे स्वरूप आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बीड लोकसभा निवडणुकीची संपुर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर आपल्या लहान बहिणीला विजयी करण्यासाठी पंकजा मुंडे जीवाचे रान करत आहेत. पंकजा मुंडे यांचे दोन चुलत भाऊ धनंजय मुंडे व दुसरा एक भाऊ अगोदरच राष्ट्रवादीत आहेत. लोकसभा निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली असताना रामेश्वर मुंडे या तिसऱ्या भावाने देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी प्रवेश केला.