Sat, Jun 06, 2020 16:11



होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : उमरगा पालिकेसमोर अनोखे हलगी नाद आंदोलन (video)

उमरगा पालिकेसमोर हलगी नाद आंदोलन (video)

Published On: Jul 16 2019 3:02PM | Last Updated: Jul 16 2019 3:02PM




उस्मानाबाद : प्रतिनिधी

उमरगा शहरातील काही भागात विविध समस्यांनी ठाण मांडले असून त्या तत्काळ सोडवून जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी काल सोमवार (ता.१५) पासून माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे व माजी नगरसेवक दत्ता रोंगे यांनी नगर पालिके समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

आंदोलनाची प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जात नसल्यामुळे आज (मंगळवार) सकाळ पासून पालिके समोर हलगी नाद सुरू केला आहे. जोपर्यंत मागण्यांच्या निवेदनाची दखल घेवून लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे अंदोलन करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष पोपटराव सोनकांबळे यांनी सांगितले.