Thu, Oct 17, 2019 05:44होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

उस्मानाबाद : आरक्षणासाठी सहा जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Aug 20 2018 5:15PM | Last Updated: Aug 20 2018 5:15PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच आंदोलकांवरील गुन्हेही तत्काळ मागे घ्यावेत या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या सहा पदाधिकार्‍यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सकाळी नऊपासूनच छत्रपती शिवाजी चौकात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. 

या संघटनेतर्फे गेल्या आठवड्यात तेरणा धरणात जलसमाधीचाही इशारा दिला होता. तिथेही पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना १३ ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. 

या शिवाय सरकारने आरक्षण देण्याचा शब्द पाळण्याचीही मागणी केली होती. या मागण्या मान्य न झाल्यास २० ऑगस्टला शहरातील शिवाजी महाराज पुतळा चौकात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आनंदनगर पोलिसांनी या चौकात सकाळी 9 पासूनच मोठा फौजफाटा तैनात केला होता. अग्‍निशमन दलाचा बंबही दाखल झाला होता. साध्या वेशातील पोलिसही तैनात केले होते.