Mon, Jun 01, 2020 20:07
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › 'दैनिक पुढारी' शुभारंभ विशेषांकास वाचकांचा मोठा प्रतिसाद

'दैनिक पुढारी' शुभारंभ विशेषांकास वाचकांचा मोठा प्रतिसाद

Published On: May 29 2019 1:48PM | Last Updated: May 29 2019 1:48PM
लोहारा : प्रतिनिधी, यशवंत भुसारे     

दैनिक पुढारी शुभारंभ  विशेषांकास  प्रारंभ झाला असून लोहारा शहरासह तालुक्यातील वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत  आहे. 

या तालुक्यातील राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील तात्काळ घडामोडींचा लेखाजोखा सडेतोड माडणारे  व प्रचंड खपाचे एकमेव दैनिक पुढारी या वृतपत्रांचा लोहारा शहरातील कॉग्रेस पक्षाचे युवा नेते  व मा जि. प. सदस्य अविनाश माळी, शिनु माळी नगरसेवक नगरपंचायत लोहारा, शाय नारायणकर नगरसेवक, बालाजी बिराजदार पत्रकार,  हाजी बाबा शेख भाजपा नेते, अबास शेख. विक्रोत सगशेटी भाजपा तालुका अध्यक्ष, अरिफ खानापुरे, बळी कोकणे, सचिन ठेले,  संभाजी पोतदार आदीच्या उपस्थितीत वाचकांचा  दैनिक पुढारी या वृत्तपत्राच्या अंकाचा शुभारंभ वाचकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वाचकातून मोठा प्रतिसाद मिळाला असून पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.