Sat, Jun 06, 2020 16:14होमपेज › Marathwada › बीड ऑनर किलिंग प्रकरणातील एकाला अटक

बीड ऑनर किलिंग प्रकरणातील एकाला अटक

Published On: Dec 24 2018 12:39PM | Last Updated: Dec 24 2018 12:39PM
बीड : प्रतिनिधी

बहिणीबरोबर प्रेम विवाह केला म्हणून सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची ऑनरकिलिंगची घटना बीडमध्ये १९ रोजी घडली होती. या प्रकरणात खुनाचा कट रचण्यात सहभागी असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला बीड पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे दोघे अजूनही फरार आहेत.  

बीड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आसताना सुमित वाघमारे आणि भाग्यश्री लांडगे यांचे प्रेम सबंध जुळले. घरच्यांचा लग्नाला विरोध असतानाही दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले होते. दरम्यान १९ डिसेंबर रोजी भाग्यश्री आणि सुमित परीक्षा देण्यासाठी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज येथे आले होते. यावेळी भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांनी सुमित वाघमारे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघमारे पोलिसांना सापडलेले नाहीत. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर चौफेर टीका होत असताना सोमवार दि २४ डिसेंबर रोजी सकाळी ऑनरकिलिंग प्रकरणाच्या कटात सहभाग असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला पोलिसांनी अटक केली.