Sun, Jun 07, 2020 09:07होमपेज › Marathwada › बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या-घेणाऱ्या विरुद्ध लातुरात गुन्हा,  सांगलीतून एकास अटक

बनावट क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या-घेणाऱ्या विरुद्ध लातुरात गुन्हा, सांगलीतून एकास अटक

Published On: Feb 09 2019 1:09AM | Last Updated: Feb 09 2019 1:08AM
लातूर : प्रतिनिधी 

नौकानयन स्पर्धेत भाग न घेता ही  स्पर्धा उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवणाऱ्यासह ते प्रमाणपत्र वितरित केलेल्या एका संघटनेच्या तिघां विरुद्ध येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकास अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत. दत्ता सदाशिव पाटील (सांगली) असे अटकेत असलेल्या आरोपचे नाव असून न्यायालयाने त्याला दहा फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सांगलीवाडी येथील दत्ता पाटीलला अटक

लातूरच्या क्रीडा उपसंचालक  उर्मिला मोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाची माहिती अशी की सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य कनोइंग अँड कयाकिंग  चंपियनशिप २०१६ या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील बळीराम दत्तू झिरमिरे याने भाग घेतल्याचे दाखवत महाराष्ट्र असोसिएशन फॉर कनोइंग  अँड कयाकिंग या  संघटनेकडून या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याचे प्रमाणपत्र घेतले होते. या प्रमाणपत्रावरून त्याला खेळाडूसाठी असलेल्या नोकरीतील पाच टक्के आरक्षणाचा लाभ घ्यायचा होता. त्यासाठी उपसंचालकांकडून त्या प्रमाणपत्राची वैधता तपासणी बंधनकारक होते  त्यामुळे त्याने लातूर येथील क्रीडा उपसंचालकाकडे ते ३ मार्च २०१७ रोजी दाखल केले होते. तपासणीत ते अवैद्य असल्याचे आढळले होते असे असले तरी झिरमिरे याने ऑनलाईन पद्धतीने पुन्हा वैधतेसाठी १७ जुलै २०१७ रोजी प्रस्ताव दाखल केला होता. हे प्रमाणपत्र वितरीत केलेल्या संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता नसल्याने ३१ जुलै २०१८ रोजी प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. या निकालाविरुद्ध झिरमिरे याने  क्रीडा सहसंचालक पुणे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. विशेष म्हणजे  स्पर्धेत भाग न घेता ५० हजार रुपये देऊन सावंत या व्यक्तीकडून आपण हे प्रमाणपत्र घेतल्याचे सुनावणीत झिरमिरे यांनी लेखी दिले होते त्यामुळे क्रीडा सहसंचालकांनी उपसंचालक काचा निर्णय कायम ठेवला होता. प्रमाणपत्र बनावट असल्याचे माहीत असतानासुद्धा ते गैरमार्गाने मिळवल्यामुळे बळीराम झिरमरे याच्यावर तर ते देणाऱ्या संघटनेचे दत्ता सदाशिव पाटील, दिनकर पाटील सोमनाथ पटोले व सावंत य तू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास नवले यांनी सांगितले. दत्ता पाटील यास सांगली येथून अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.