Mon, Jun 01, 2020 17:22
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › खैरुल्ला खान व २२ दिवसाचा चिमुकला बेपत्ताच 

ओमन ढगफुटी : माजलगावच्‍या बेपत्ता खान कुटुंबियांतील चार मृतदेह सापडले 

Published On: May 21 2019 12:44PM | Last Updated: May 21 2019 1:45PM
माजलगाव ( बीड)  : प्रतिनिधी

खैरुल्ला खान  हे आपल्या कुटुंबियासह ओमन देशातील झालेल्या ढग फुटीतील पुरात शनिवारी (दि.१८)   बेपत्ता झाले होते.  तब्बल ६० तासाच्या नंतर घटना स्थळावरुन २२ किमी आंतरावर खान कुटुंबातील सहा जनापैकी चार जणांचे मृतदेह  सापडले आहेत. खैरुल्ला खान व २२ दिवसाचा चिमुकला आध्याप बेपत्ता आसल्याची माहिती मिळाली आहे. तर खैरुला खान यांची पत्नी शबाना (वय ४८) यांची ओळख पटली असून अन्य जणांची ओळख अध्याप पटली नाही. व त्यांच्यावर ओमन देशांत अंतिम विधी होणार असल्याची माहिती शबाना बेगाम खैरुल्ला खान यांचे भाऊ आसलम खान यांनी दिली.

ओमन देशात नौकरीला आसलेल्या आपल्या मुलाला  मुलगा झाला आहे. म्हणुन भेटण्यासाठी गेलेल्या माजलगाव येथील खैरुल्ला खान  व त्‍यांच्‍या पत्नीसह   ६ मे रोजी गेले होते.  तेथील पर्याटनस्थळ पाहाण्यासाठी पत्‍नी, मुलगा व सून तसेच  तीन नातवासोबत दि.१८ मे रोजी फिरायला गेले होते. यावेळी भारतीय वेळेनुसार सायंकाळी  ७ तर तेथील वेळेनुसार ५ वाजता या ठिकाणी अचानक ढगफुटी झाल्‍याने आलेल्या महापुरात खैरुला खानयांच्‍यातील कुटुंबातील ६ जण बेपत्ता झाले.  सुदैवाने त्यांचा मुलगा सरदार खान एका झाडाच्या फांदीचा आधार घेत बचावला. 

 या घटनेची वार्ता माजलगावला समजताच त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकासह हितचिंतकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात हाळहाळ व्यक्त होत अहे. ओमन देशाच्या बचाव मदत कार्या करणाऱ्यानां तब्बल ६० तासानंतर घटनास्थळापासुन २२ कि.मी.आंतरावर तेथील पुराच्या  फसलेल्या गाळात अन्य सापडलेल्या मृतदेहात माजलगावच्या खान कुटुंबियांतील   चार मृतदेह आहेत.  तर खैरुल्ला खान  व २२ दिवसाचा चिमुकला नातु अद्याप बेपत्ता असल्‍याची खान कुटुंबियांच्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे. 

शबाना खान खैरुला खान (वय ४८) ,आरशी खान सरदार खान (वय २८),शिद्रा सरदारखान (वय ४) व जहेद सरदार खान यांचे मृतदेह सापडले आहेत.  इब्रा शहरातील एका हॉस्‍पिटलमध्‍ये त्‍यांचे मृतदेह ठेवण्‍यात आले आहेत. 

खैरुला खान जिंवत असण्याची आशा..

 या ढगफुटी दुर्घटनेत पुरात बेपत्ता झालेले अन्य जणांचे मृतदशह सापडले आसुन सुरुवातीला खैरुला खान  यांचा मुलगा जाग्यावरच वाचला होता. च पध्दतीने पुढे खैरुला खान कुठेतरी वाचले आसावेत कारण त्यांचे अन्य नातेवाईकांचे  मृतदेह  मात्र खेरुला खान कुठेतरी जिवंत असण्याची आशा माजलगावकरांमध्ये निर्माण झाली आहे.