होमपेज › Marathwada ›  लातुरच्या बसवेश्वर महाविद्यालयात नऊ लाखाचा अपहार 

 लातुरच्या बसवेश्वर महाविद्यालयात नऊ लाखाचा अपहार 

Published On: Oct 09 2018 7:22AM | Last Updated: Oct 09 2018 7:22AMलातूर : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्कापोटी भरलेल्या रकमेत येथील बसवेश्वर महाविद्यालयाच्या दोन कर्मचाऱ्यांनी अपहार केला असून ही रक्कम त्यांनी रेनापुरच्या कला केंद्रावर उधळली आहे. ९ लाख १३ हजार ३२०  रुपयांचा हा अपहार असून, याप्रकरणी  त्यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विनायक लोमटे व सतीश  अमुलवाड अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. 

विनायक हा लिपिक असून, सतीश हा शिपाई आहे.  विद्यार्थ्यांनी जमा केलेले शैक्षणिक शुल्क बँकेत भरण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सतीश तो बँकेत भरायचा.  दोघांच्या संमतीने  काही रक्कम भरली जायची.   शंका येऊ नये म्हणून बँकेच्या  पावतीवर  पैसे भरताना सतीश काही जागा सोडायचा.  रक्कम  भरल्यानंतर  व शिक्का घेतल्यानंतर पावतीवर पुन्हा आकडे टाकायचा  त्यामुळे शंका येत नसे. काही दिवसांपूर्वी लोमटेचे वडील वारल्याने तो रजेवर होता त्यामुळे  चार्ज अन्य लिपीकाकडे देण्यात आला होता. त्यांच्या पाहणीत हे काळे बेरे उघड झाले. पोलिसांनी या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी अपहाराची कबुली दिली असून, यातील बरीच रक्कम त्यांनी नर्तिकांवर  उधळल्याचे सांगितले.