Sat, Aug 17, 2019 19:48होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शेतकर्‍यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Published On: Dec 08 2018 1:51AM | Last Updated: Dec 08 2018 1:40AM
माजलगाव : प्रतिनिधी

दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चार्‍याचा, मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. सरकारकडून मात्र यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. त्या तातडीने करण्यात याव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेलगाव चौकात शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.

\माजलगाव विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. लोक मजुरीसाठी स्थलांतर करत आहेत तर गुरा, ढोरांना चारा नसल्यामुळे शेतकरी ऊसतोडीला जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ  लोकांवर आली आहे. परंतू दुष्काळी परिस्थितीत ज्या उपाययोजना करायला हव्यात त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेलगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल एक ते दीड तास चालले . चारही रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिला.