Sun, Jun 07, 2020 08:54होमपेज › Marathwada › मोदी सरकार सवर्र्च पातळ्यांवर अपयशी 

मोदी सरकार सवर्र्च पातळ्यांवर अपयशी 

Published On: Apr 11 2019 2:06AM | Last Updated: Apr 10 2019 11:56PM
प्रतिनिधी : लातूर

केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. हे अपयश, निष्क्रियता सैनिकांच्या बलिदानाआड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत आहेत, अशी टीका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केली.  

काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र  कामंत यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 9) रात्री लातुरात आयोजित सभेत पायलट बोलत होते़. अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते़. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, बसवराज पाटील, अ‍ॅड. त्र्यंबक भिसे आदी उपस्थित होते़. 

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर  महाआघाडीच्या उमेदवारांना विजय करावे असे आवाहन करून पायलट म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांचे काय झाले? याची विचारणा मतदारांनी करण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव, पीकविमा मिळाला नाही, कर्जमाफ झाले नाही, वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण झाले नाही, प्रत्येकांच्या बँक खात्यावर 15 लाख पडणार होते तेही झाले नाही़. आश्‍वासनांची पूर्तता सोडाच विकासाच्या योजनाही राबवल्या गेल्या नाहीत़. पाच वर्षांत हुकूमशाही केली़  कोणी काय खावे यावर बंधने आणली, देशात भय निर्माण केले़  भावाभावांत भांडणे लावली. आक्रमणाचे राजकारण केले. 

पाच हजार वर्षांपूर्वीची भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. न्यायपालिकेसह इतर  महत्त्वाच्या संस्थांवर दबावतंत्राचा वापर केला, प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवले़ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली अशी टीका त्यांनी केली.