Sun, May 31, 2020 01:48होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आमदार देशमुखांना धक्काबुक्की 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आमदार देशमुखांना धक्काबुक्की 

Published On: Aug 22 2018 5:28PM | Last Updated: Aug 22 2018 5:29PMमाजलगाव : प्रतिनिधी

राजेवाडी येथे आयोजित साठे जयंती उत्सव कार्यक्रम आटोपून परत निघालेल्या आ.आर.टी. देशमुख यांना चार वर्षात विकास कामे का केली नाहीत असे म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाडीतून बाहेर खेचून धक्काबुक्की केली. त्यांच्या स्वीयसहाय्यकासही मारहाण करून त्याचा मोबाइल फोडल्याची घटना आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. 

राजेवाडी येथे बुधवारी अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आमदार देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जयंतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान ते परत निघाले असता, येथील जिल्हापरिषद शाळेजवळ गावातील राष्ट्रवादीच्या उपसरपंचाचे पती रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद, भाऊसाहेब पवार, माऊली महागोविंद, ईश्वर थेटे, सुखदेव कुरे यांच्यासह 25 ते 30 लोकांनी गाडी अडवून ‘आमच्या गावात चार वर्षात एकही विकास कामं का केले नाही तसेच बंधार्‍याचे काम का केले नाही’ असे म्हणून त्यांना घेराव घालत गाडीतून खाली खेचून धक्काबुक्की केली. याच वेळी त्यांचे पीए पवार यांचा मोबाइल फोडला तसेच गाडी चालकाला देखील मारहाण करण्यात आली. या वेळी साठे जयंतीचे आयोजक तात्काळ धावून आले व त्यांनी आमदारांभोवती कडे करून तेथून बाजूला आणले तसेच पोलिसांनाही माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आ.देशमुख यांना तेथून रवाना केले.  या घटनेमुळे एकच खळबळ मजली आहे.