Sun, Jun 07, 2020 16:22होमपेज › Marathwada › माजलगावमधून पळून गेलेले प्रेमीयुगुल चंदनझिरात चतुर्भुज

माजलगावमधून पळून गेलेले प्रेमीयुगुल चंदनझिरात चतुर्भुज

Published On: Jan 07 2019 6:56PM | Last Updated: Jan 07 2019 6:56PM
जालना : प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील १७ वर्षीय मुलीसोबत मोबाईलवरून मैत्री करून जालन्याच्या तरुणाने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. युवतीला आठ दिवसापूर्वी त्या तरुणाने जालन्यात पळवून आणले होते. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात मुलीला फूस लावून पळवून घेऊन गेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

यानंतर आज चंदनझिरा पोलिस सुंदरनगर भागात गस्त घालत असताना दुचाकीवरून मुलगा व मुलगी पोलिसांना पाहून संशयास्पदरित्या चेहर्याला रुमाल बांधून वेगात जाताना दिसली.

यानंतर त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता, त्या तरुणाने मुलीला पळवून आणल्याची कबुली दिली. चंदनझिरा पोलिसांनी त्या प्रेमीयुगुलास ताब्यात घेऊन दिंद्रुड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक बाबासाहेब पवार, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोण्डले, पोलिस कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भडांगे, गोपाळ दिलवाले, नंदू दांडगे, श्रद्धा बर्डे यांनी काम पाहिले.