Tue, Sep 17, 2019 03:38होमपेज › Marathwada › जनतेच्या सेवेसाठी वाहून घ्या

जनतेच्या सेवेसाठी वाहून घ्या

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 10:25PMपरळी : प्रतिनिधी

जनतेच्या कामात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून सदैव तत्पर राहून काम करा. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात अग्रगण्य पक्ष म्हणून पुढे येत आहे. वाढता जनाधार आणि विद्यमान सरकारच्या विरुद्ध असलेला जनतेचा रोष या अनुषंगाने येणारा काळ आपला आहे हे लक्षात घेऊन जनतेसाठी वाहून घ्या असे मार्गदर्शन राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी शहरची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सरकारच्या विरोधात चांदा ते बांदा लाट आहे. परळीचा राष्ट्रवादीचा गड आणखी मजबूत करण्यासाठी निर्धार करा. आपण निधी आणतो पण विरोधकांकडून खोडा घालायचे राजकारण सुरू आहे. खा. शरद पवार यांच्यामुळे 500 कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प साकरला. शहराच्या विकासाकरिता सर्वस्व पणाला लावत आहे.  सर्वांगीण विकसित शहर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी सर्वांनी एकदिलाने सकारात्मक काम करावे. शहरात आपली खूप मोठी ताकद आहे, ही ताकद खर्‍या अर्थाने सेवेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेउन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, जनतेच्या सेवेनेच आपल्या कामाचे सार्थक होईल असेही मुंडे यावेळी म्हणाले सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन अनंत इंगळे यांनी केले.

यावेळी अजय मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, अय्युब पठाण, चंदुलाल बियाणी, प्रा. डॉ. विनोद जगतकर, अब्दुल बाशीत, वाल्मीक कराड, दीपक देशमुख, जाबेर खान पठाण, शरद मुंडे, निलाबाई रोडे, राजाखान पठाण, शकील कुरैशी, जयपाल लाहोटी, वैजनाथ बागवाले, श्रीकांत ढेले आदी उपस्थित होते. 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex