Mon, Jun 01, 2020 18:17
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › मराठवाडा : लातूरला भूकंपाचा सौम्य धक्‍का

मराठवाडा : लातूरला भूकंपाचा सौम्य धक्‍का

Published On: Sep 13 2018 3:17PM | Last Updated: Sep 13 2018 3:18PMवसमत : प्रतिनिधी

मागील अनेक महिन्यांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात भुगर्भातून आवाज येत असल्याचे प्रकार सुरू होते. आज, गुरूवार (दि. १३ सष्टेंबर) सकाळी नऊच्या सुमारास वसमतला भुकंपाचे सौम्य जाणवले. भुगर्भातून अचानक मोठे आवाज येत जमीन हादरल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. तर, लातूर येथे दोन रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती तहसील प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात मागील काही महिन्यांपासून जमिनीतून गुढ आवाज येऊ लागले होते. या आवाजामुळे या परिसरातील गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर नागरिकांच्या म्हणण्यानुसार अचानक मोठा आवाज होवून काही वेळ जमीन हलत असल्याची काही दिवसांपासून म्हणणे होते. परंतु या गुढ आवाजाचे गुढ अद्यापही उकलले नाही. 

त्यातच मागील आठवडाभरात दोन वेळेस भूगर्भातून आवाज झाले. परंतु त्याची नोंद लातूर येथील भूकंप मापक केंद्रात नोंद झाली नव्हती. आज, गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास मोठा आवाज होऊन जमीन हलल्यासारखे जाणवले. याची नोंद लातूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली असून २ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाल्याचे तहसील प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा प्रकार घडल्याने या भागातील नागरीक भयभित झाले आहेत. पांगरा शिंदे सह कुपटी, वापटी, शिरळी,राजवाडी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, सोडेगाव, सालेगाव, असोला, बोल्डा, नांदापूर आदी परिसरातही सौम्य धक्‍का जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी गंभीर दखल घेतली असून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संबंधित गावामध्ये कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.